शेती हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारत देश शेती व्यवसायात खूप मोलाचा वाटा उचलत आहे. शेती मधून भारताचे आर्थिक उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार कडून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
शेती तसेच शेती पूरक व्यवसाय साठी सरकार कडून विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्थाहण देणाऱ्या घटकासाठी सरकार कडून अनुदान वितरित करण्यात येते. आज आपण शेती तसेच शेती पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय साठी आवश्यक लागणारी कडबा कुट्टी मशीन योजना या योजनेविषयी सर्व माहिती या लेखात घेणार आहोत.
दुग्ध व्यवसाईक शेतकऱ्यांचा जनावरांच्या चाऱ्यावर जास्तीत जास्त खर्च होतो. बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या चाऱ्याची नासाडी होते. या नासाडी वर प्रतिबंध करण्यासाठी चाऱ्याची कुट्टी करून चारा वापरल्यास शेतकऱ्यांच्या चाऱ्यावर होणारा खर्च ३० ते ३५ टक्के कमी करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस देखील मदत होते.
जनावरांना चारा कुट्टी करून वापरल्यास जनावरांना त्या चाऱ्यापासून जास्त फायदा मिळतो. कडबा कुट्टी मशीन च्या माध्यमातून चारा दिल्यास दूध देण्याऱ्या जनावरांच्या दूध वाढीस मदत मिळते. व आपल्या चाऱ्याची देखील बचत होते. ज्या मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे. आज आपण कडबा कुट्टी मशीन योजना या विषयी सर्व माहिती घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तसेच लागणारे कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया या विषयी सर्व माहिती घेणार आहोत.
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र राज्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | |
लाभ | 20000 रुपये |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. |
कडबा कुट्टी मशीन योजना उदिष्ट
- राज्यातील दुग्ध उत्पादन वाढवणे.
- शेतकऱ्यांच्या चारा व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे.
- चाऱ्याची कुट्टी करून वापरल्यामुळे जनवारांचे आरोग्य सुधारणे.
- कमी चाऱ्यामद्धे जनवरांचे संगोपन करणे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
- शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे.
- शेती व शेती पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसायात वाढ करणे.
कडबा कुट्टी मशीन योजना वैशिष्ट
- राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- कडबा कुट्टी मशीन योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध केलेली आहे.
- कडबा कुट्टी योजनेचे अनुदान डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
- शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कुट्टी मशीन घेण्याची मुभा देण्यात येते.
- शेतकरी सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेत निवड प्रक्रिया ही लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येते
कडबा कुट्टी मशीन योजना फायदे
- कुट्टी मशीन ला इलेकट्रिक मशीन जोडलेली असल्यामुळे चारा कापण्यास खूप कमी वेळ लागतो.
- जास्त चारा कमी वेळेत कापण्यास मदत होते.
- चारा बारीक केल्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपा जातो.
- चाऱ्याची नासाडी होत नाही त्या मुळे चाऱ्याची बचत होते.
- चारा बारीक केल्यामुळे कमी जागेत चारा साठवणूक करता येते.
- बारीक चारा जनावरांना दिल्यामुळे जनावरांचे पचनक्रिया सुधारते.
- पचन क्रिया सुधारल्यामुळे दुबत्या जनवरांकडून अधिक उत्पन्न मिळते.
कडबा कुट्टी योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- सातबारा
- आठ चा उतरा
- मोबाइल क्रमांक
- ईमेल आयडी
- लाइट बिल झेरॉक्स
अर्ज प्रक्रिया
कडबा कुट्टी योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आसल्यामुळे अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. अर्ज करण्यासाठी आपणास महाडीबीटी या पोर्टल वर जावे लागेल. या संकेतस्थळार आल्यानंतर उजव्या बाजूला नवीन अर्जदार नोंदणी पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून आपण आपले खाते तयार करून घ्यावे. खाते तयार केल्यानंतर आपले यूजर आयडी पासवर्ड तयार करून घ्यावा. त्या नंतर होम पेज वरती येऊन आपला आयडी पासवर्ड टाकून घ्यावा व लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर आपले आधार कार्ड डीटेल भरावे. आधार कार्ड डिटेल भरल्यानंतर आधार सत्यापित करून घ्यावे.
त्या नंतर परत आपला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावे. आपल्या समोर अर्ज करा हा पर्याय दिसेल. या वर क्लिक करून नंतर कृषि यांत्रिकीकरण या पर्याय निवडा. सर्व मुख्य घटक तपशील सामग्री निवडून आपला अर्ज सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर चलन भरा आपला अर्ज व्यवस्थित सादर झाला याची खात्री करा.
कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान
कडबा कुट्टी मशीन साठी सरकार कडून शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यन्त अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त 20000 पर्यन्त अनुदान सरकार कडून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते. तुमच्या खरेदी केलेल्या बिलाच्या 50 टक्के किंवा 20000 या पैके जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.
निष्कर्ष
कडबा कुट्टी मशीन योजना या विषयी सर्व माहिती आपण घेतलेली आहे. आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अर्ज करण्याची पद्धत सर्व माहिती आपणास दिलेली आहे. आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ति ज्यांना कुट्टी मशीन आवश्यक आहे अश्या व्यक्ति पर्यन्त ही माहिती पोहोच करा.
आपणास अर्ज करताना किंवा दुसरी काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करा आम्ही आपणास नक्कीच मदत करू
FAQ
- कडबा कुट्टी मशीन किंमत ?
- कडबा कुट्टी मशीन 16000 ते 60000 रुपये पर्यन्त
- कडबा कुट्टी मशीन योजना मध्ये किती अनुदान मिळते ?
- खरेदी केलेल्या बिलाच्या 50 टक्के किंवा 20000 या पैके जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.
- कडबा कुट्टी योजना मध्ये अर्ज करण्याची पद्धत ?
- कडबा कुट्टी मशीन योजना मध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- कडबा कुट्टी योजना अधिकृत संकेतस्थळ कोणते ?
- कडबा कुट्टी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/ हे आहे.
3 thoughts on “50 % अनुदान कडबा कुट्टी मशीन योजना”